मदनापूर शेतात लावलेल्या विधुत प्रवाहाने घेतला विद्यार्थ्यांचा नाहक बळी! – घरघुती मीटर वरून लावला होता विद्युत प्रवाह.. – संबंधितांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावे.:- काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी…

     रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी 

चिमूर:-

         चिमूर तालुक्यातंर्गत मौजा मदनापूर येथील व्यायाम करण्यासाठी गेलेला विद्यार्थी प्रांतविधी नंतर विद्युत प्रवाहामुळे मृत्यू पावल्याची हृदयद्रावक घटना घडली.

         दैनंदिन वेळे प्रमाणे सकाळी धावण्यासाठी गेलेला विध्यार्थी व्यायाम करून प्रांतविधी करण्यासाठी बाजूच्या शेतात गेला असता शेतकऱ्याने अवैध रित्या लावलेल्या विद्युत प्रवाहाने विध्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला असल्याची गंभीर घटना घडली.

           विष्णू विनोद कामडी वय ११ वर्षें राहणार मदनापूर असे मृतक विध्यार्थ्यांचे नाव आहे.मदनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेला विध्यार्थी विष्णू विनोद कामडी आपल्या काही मित्रा सोबत नेहमी प्रमाणे गावाच्या बाहेर धावण्यासाठी गेला होता.

           दरम्यान मित्रांसोबत व्यायाम करून विष्णू प्रांतविधी करण्यासाठी बाजूच्या शेतात गेला असता शेतात घरच्या वीज मीटर वरून अवैधरित्या लावलेल्या ताराच्या कंपाऊंडला वीज प्रवाहाचा जबरदस्त झटका लागला.या प्रवाहाने विष्णू कामडी या विद्यार्थ्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

        घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देताच,चिमूर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आणल्या गेले.घटनेचा तपशिल चिमूर पोलीस घेत असून पुढील कारवाई काय करतात याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांचे लागले आहे.

***

अवैध वीज प्रवाह लावणाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा :- कांग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी..

        मदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेत पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा घरगूती वापराच्या मीटर वरून ताराच्या कुंपणाला प्रवाह लावल्याने हकनाक बळी गेला,या बळीसाठी जवाबदार असलेल्या गोवर्धन रंदये यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून,मृतकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी कांग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेत केली.

            यावेळी पत्रकार परिषदेत कांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,तालुका अध्यक्ष विजय गावंडे पाटील,अविनाश अगडे,विनोद ढाकुंनकर,सुभाष बन्सोड,रहेमान पठाण उपस्थित होते.