नीरा व भीमा या दोन नद्यांच्या संगमावर आणि लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये एवढा मोठा सोहळा होणे हे बापूसाहेब महाराज यांचे भाग्यच आहे…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

 जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आकरावे वंशज गुरुवर्य बापूसाहेब महाराज देहूकर मळवली यांचा अभिष्टचिंतन सोहळाच्या निमित्ताने आसलेला अखंड हरिनाम सप्ताह चालू आसुन. संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्धी झाली आहे. आनेक भागातून वेगवेगळे नामावंत कीर्तनकार किर्तनसेवा करण्यासाठी येत आहेत गुरुवार दिनांक 2/11/ 2023 रोजी श्री गुरु केशव महाराज नामदास पंढरपूर यांची कीर्तन सेवा झाली.

         950 हुन अधिक टाळकरी कीर्तन सेवेसाठी उपस्थित होते. तसेच 9 हजार रोज भाविकांच्या उपस्थितीत श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या 65 व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पुणे, सोलापूर, सातारा,नगर, या चार जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थित जास्ती जास्त यऊ लागली आहे.

                 अनेक भागा-भागातील कार्यकर्ते पदाधिकारी व आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच पंढरपूर देवस्थान कमिटी, आळंदी देवस्थान कमिटी व देहू संस्थांचे सर्व पदाधिकारी व लक्ष्मी नरसिंह देवस्थान कमिटी ,या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सप्ताहासाठी दररोज किर्तन सेवेसाठी उपस्थितीत आहेत. सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह भ प अंकुश महाराज रणखांबे विणेकरी वेदमूर्ती आनंद काकडे काका तर श्री शेत्र निरा नरसिंहपुर सप्ताह कमिटीच्या वतीने व परीसरातील शंभर हून अधिक गावांचा यामध्ये समावेश आहे. अभिष्टचिंतन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहासाठी दररोज आलेल्या सर्व वारकरी भाविक भक्त व श्रोते यांना मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा ही दररोज देण्यात येत आहे. व आनंदाने याचा लाभ भाविक घेत आहेत. 

            सप्ताहाच्या शेवटी रविवार दिनांक 5/11/2023 रोजी लक्ष्मी नरसिंहच्या पावन भूमीमध्ये श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा व सन्मान हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

            तसेच सकाळी 8 वाजता संपूर्ण गाव दिंडी प्रदक्षिणा टाळ आणि मृदंगाच्या आवाजात घेण्यात आल्यानंतर सकाळी 9 ते11 या वेळेत श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर सप्ताहाची सांगता होईल. पहिल्यापासून ते शेवटपर्यंत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सप्ताह कमिटीचे कार्य अध्यक्ष ह भ प राम महाराज अभंग व ह भ प महेश सुतार महाराज हे करीत आहेत.