बरांज ( मो ) तंटामुक्ती अध्यक्ष पदी देविदास पुनवटकर यांची नियुक्ती…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

             तालुक्यातील बरांज ( मो ) ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत देविदास पुनवटकर यांची नियुक्ती करण्यात आली.

         ही नियुक्ती दि. 28 ऑगस्ट 2023 रोज सोमवार ला बरांज ( मो ) ग्रामपंचायत सरपंच सौ. मनीषा ठेंगणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत करण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी देविदास पुनवटकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

               यावेळी ग्रामपंचायत सचिव नितीन पांढरे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा बाळपणे, विठ्ठल पुनवटकर तसेच सुरेश कातकर, हेमराज कुळसंगे, सचीन कातकर व अंकुश परचाके इत्यादी उपस्थित होते.