डॉ. आंबेडकर विद्यालयाचा ९८.७९% निकाल…

 

ऋषी सहारे 

संपादक

आरमोरी,

डॉ. आंबेडकर विद्यालय यांनी आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत यावर्षी सुद्धा मार्च २०२३ च्या एस.एस.सी. च्या परीक्षेत ९८.७९% निकाल दिला. परीक्षेला १६६ विद्यार्थी बसले, त्यामधून १६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल ९८.७९% लागला. प्राविण्य श्रेणीमध्ये ३४, प्रथम श्रेणीमध्ये ७७, द्वितीय श्रेणीमध्ये ४७, पास श्रेणीमध्ये ६ शाळेतून प्रथम निकेतन वसंत आढाव ह्याला ९२.६० % ,द्वितीय मंगेश महेंद्र चौधरी ह्याला ९२.४० %, तृतीय कु. दिशांती विजय उंदिरवाडे ९० % तर चतुर्थ कु. पूजा मोरेश्वर बांबोळे ९० % टक्के प्राप्त झाले.

       सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनजी मेश्राम , सचिव प्रशांत मेश्राम , प्राचार्य व्ही. जी. शेंडे , प्रसिद्धी प्रमुख हंसराज बडोले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.