खल्लार हायस्कुल खल्लारचा ९६.४९% निकाल,उत्कृष्ठ.. — निकालाची परंपरा कायम..

 

युवराज डोंगरे/खल्लार

      महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती विभागाद्वारे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित,असलेल्या खल्लार हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी सुध्दा कायम राखली.

           एस .एस .सी मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. खल्लार हायस्कुलचा निकाल ९६.४९%लागला आहे.

         या परीक्षाकरीता एकुण ५७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये कु. अक्षरा प्रमोद काळंके हिने८५.८०% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला, कुमारी श्रुती संतोष सावरकर ८५.४०% व वेदांत अनिल तुपसुंदर ८५.४०% या दोघांनी सारख्याच गुणांनी दुसरा क्रमांक मिळविला, कुमारी गौरी अविनाश बारब्दे ८४.४०% गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

         विद्यालयातील १२ प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत २७ , द्वितीय श्रेणी १३ व तृतीय श्रेणीत ३ उत्तीर्ण विद्यार्थी झालेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य केशवराव रा. गावंडे कार्यकारणी सदस्य तथा शाळा समिती सदस्य खल्लार, सुधाकर जुनघरे ,मधुसूदन धाबे, पंजाबराव टवलारे, गुणवंत गावंडे तसेच मुख्याध्यापक डी .आर. नवरे तथा सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.