पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पूरस्काराने शामलता डांगे सन्मानित.

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

सिंदेवाही 

        महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध क्षेत्रांत सामाजिक दायीत्व जोपासुन सेवा देणाऱ्या महीलांची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय खातगाव च्या वतीने येथील सामाजीक कार्यकर्त्या शामलता विनायक डांगे यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

            सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या शामलता विनायक डांगे या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान पंचायत समिती कक्ष सिंदेवाही अंतर्गत संवीधान महीला ग्रामसंघ मध्ये २०१७ पासून खातगाव येथे आय. सि. आर. पी. म्हणून कार्यरत आहेत.

                त्यांच्या नेतृत्वात २१ गट कार्यरत असुन २२५ ते २५० महीलांचा समुह काम करीत आहे. सामाजिक कार्यासह वरीष्ठ स्तरावरून येणाऱ्या योजना व्यवस्थित समजावून सांगणे व त्यांना प्रवुत्त करणे या माध्यमातून महीलांचे समुपदेशन, सक्षमीकरण करण्याचे काम सुरु असून नकतीच त्यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय खातगाव यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व चेक सरपंच मेघशाम शिडाम, उपसरपंच निखिल पोहणकर, ग्रामसेवक मानकर, तंमुस अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य तेजेंद्र नागदेवते, सुरेखा नैताम, पो. पा. वंदना वरखडवार यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.