मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मोफत ई-श्रम कार्ड,पॕन कार्ड व “आरोग्य कार्ड वाटप…

ऋषी सहारे

संपादक

 

दि.-01 मे 2023 ला महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमीत्ताने विहीरगाव ग्रामपंचायत येथे तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात आमदार धर्मरावबाबा आत्राम व डॉ जयश्री देवगडे यांच्या सौजन्याने ई-श्रम कार्ड,पॕन कार्ड व “आरोग्य कार्ड वाटप तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबीर” घेण्यात आले.यावेळी असंख्य विहीरगाव ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेतला.या उपक्रमासाठी युवा नेते अमोल कुळमेथे व विहीरगाव ग्रामपंचायतचे सदस्य निखील बारसागडे यांनी मेहनत घेतली.