राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला येथे बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून 22 फेब्रुवारी 2026 रोजी दोन पुरुषांवर हल्लयाच्या घटनेत चेतन सुंदरसिंग ब्रह्मनाईक (वय 40) व अंधू मोतीलाल कुंभरे (वय 45) हे गंभीर जखमी झाले होते,यानंतर 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा सदानंद धरमदास उईके (वय 39) यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने तिघेही हल्ल्यातून बचावले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सलग घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आज दि. 2 मार्च रोजी आमदार रामदास मसराम यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केली तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
वनविभागाकडून परिसरात पिंजरे लावण्याची व गस्त वाढविण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सतर्क राहावे व रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या प्रसंगी सोबत: माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जीवन पाटील नाट , माजी सभापती गिरीधर तितराम, कमलेश बारस्कर,धरमदास उईके, पो.पा प्रेमजी पंधरे, वनपरिक्षेत्र अधिकारी कुरखेडा गोपूलवाड, वनपाल कुरखेडा कंकलवार, वनरक्षक कुरखेडा गोन्नाडे, वनरक्षक वडेगाव दुधबळे उपस्थित होते.



