ग्रामसभा ग्रामपंचायत मुरुमगावं तर्फे देशी-विदेशी दारू त्वरीत बदं करण्या करीता मुरुमगाव पोलीस विभागाला दिले निवेदन…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        धानोरा तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेल ग्रामपंचायत मुरुमगाव येथील ग्रामसभा ग्रामपंचायत मुरुमगावं तर्फे दिनांक 28/02/2024 रोज बुधवार ला अवैध रित्या ने देशी-विदेशि दारू त्वरीत बदं करण्यात यावा या करीता ग्रामपंचायत व ग्रामसभेचे पदाधिकाऱ्यांकडून पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव यांना निवेदन देण्यात आले.

         मागील काळात ग्रामसभेचा माध्यमातून गावातील संपूर्ण दारू बंदी करण्यात आली होती परंतू काही सुशिक्षित लोकांनी पून्हा देशी विदेशी दारू अवैध स्वरूपात विकण्याचा व्यवसाय सूरू ठेवलेला आहे आणी या पूर्वी ग्रामपंचायत कडून पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव ला अवैध स्वरूपात दारू विक्री बंद करून अवैध दारू विक्रेत्यांवर योग्य ति कार्यवाही करण्यात यावा या करीता निवेदन देण्यात आले होते पन पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव तर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आनी मोठ्या प्रमाणात मौजा मुरुमगाव येथे अवैध रित्या ने देशी विदेशी दारू विकण्याचे प्रमाण वाढले आहे.

         त्या करीता ग्रामसभा ग्रामपंचायत मुरुमगाव तर्फे पून्हा अवैध दारू विक्रेत्यां लोकांची योग्य चौकशी करून दारू बंदी सहकार्य मुरुमगाव पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव ने करावी असे निवेदन आज दिनांक 28/02/2024 ला रोज बुधवार ला मौजा मुरुमगाव येथील पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत मुरुमगाव येथील ग्रामसभा मार्फत देशी विदेशी दारू बंद करण्यात यावे असे निवेदन मुरुमगाव ग्रामपंचायत येथील पदाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले आहेत.

         त्याच प्रमाणेच मौजा मुरुमगाव ग्रामपंचायत ला लागूनच असलेलं ग्रामपंचायत हिरंगे येथील मौजा रेगेंगावं यथे पन मोठ्या प्रमाणात अवैध दारू चे विक्री सूरू आहे असे चर्चेत एकूणात आले आहे सबंधित विभाने या कडे लक्ष केंद्रित करून आळा घालने गरजेचेच आहे.

       तसेच छत्तीसगढ राज्य सिमेला लागूनच मौजा सावरगाव, गजामेढी, कूलभटी व छत्तीसगढ राज्यातील सिमेला लागूनच कोहका फाट्यावर पूर्वी देशी व विदेशी दारू विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते पन सध्या या गावात अवैध दारू विकने बंद असल्यास सध्या मुरुमगाव, रेगेगाव, वाढले आहेत असे समजून येत त्या मुळे 15वयो गटातील मूले मादक द्रव्य चा से़वन करण्यास मागे नाही ज्या मुलांच्या हातात शिक्षणाची डोर असावीत आता दारूच्या बाटली आढळून येतात आणी या बाल मूलाचे परिवारात मोठी गोधंळ निर्माण होत आहे आणी शिक्षण घेनारे मूले अधांतरीच जात आहेत.

         त्याच प्रमाणेच मौजा मुरुमगाव हे जवळचे राज्य छत्तीसगढ राज्य वरून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या दारू आनी तंबाखू ची आयात मोठ्या प्रमाणात होत होती सध्या परिस्तिथी बरी व निट आहे.

         तरी सबंधित विभागाला चौकश असने गरजेचं आहे आणी या गंभीर विषयावर सबंधित विभागाने लक्ष वेधावे अशी जनतेची व mmm. मागणी आहे.