माध्यमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ,या कार्यालयाच्या मार्फत धानोरा तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण गटसाधन केंद्र धानोरा येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोज सोमवारपासून सुरू आहे.

        या प्रशिक्षणाचे उदघाटन साळवे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून गट साधन केंद्राचे विषय तज्ञ सहारे सर यांनी स्थान भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून चौधरी सर ,सुरणकर सर ,तज्ञ मार्गदर्शक कैलास खोब्रागडे ,भाग्यवान कुलसंगे ,रुपेश मोहिते सर कीर्ती फूंडे,रजनी मडावी, स्वाती गजभिये मॅडम आधी उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा -शालेय शिक्षण , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 -एक दृष्टिकोन ,अभ्यासक्रम आणि अध्यापनाच्या शास्त्रीय संरचना ,शालेय शिक्षणाची व्यापक उद्दिष्टे, नववी ते दहावी च्या विषय योजना ,व्यवसायिक शिक्षण आंतरविद्याशाखीय क्षेत्रातील शिक्षण -शिक्षक स्वायत्तता आणि जबाबदारी ,शिक्षक शिक्षणाची बदलते स्वरूप, क्षमताधारीत आणि शाळाधारित मूल्यांकन आदी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाचे संचालन दुग्गा मॅडम यांनी केले व आभार मानले.

      तालुक्यातील 75 माध्यमिक शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.