५६ जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या ५ आरोपींना अटक.. — दोन ट्रकसह ,३७ लाख,४७ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌.

          पोलिस स्टेशन कन्हान अंतर्गत ०३ कि.मी.अंतरावरील वाघधरे वाडी कन्हान येथे काल सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन कन्हान येथील पोलीस पथक आपल्या स्टाफसह पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की,काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे.

           अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कन्हान पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी गाठले व नाकाबंदी करुन दोन ट्रक अडविले.वाहन क्र.एम.एच.- ४०,सी.डी- ९२७१ मध्ये लाल,काळ्या,पांढ-या रंगाचे बैल ३,प्रत्येकी १५,०००/-रू. प्रमाणे ४५,०००/- रू. व १६ गोरे किंमती प्रत्येकी १२,०००/- रू प्रमाणे १,९२,०००/- रू व वाहन क्र.एम.एच.- ४०/सी.डी ची किंमती १५ लाख रूपये,असा एकूण १७ लाख ३७ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

           तसेच वाहन क्र. एम. एच. ४०,सी.डी.२१४८ मध्ये लाल,काळ्या,पांढऱ्या रंगाचे ३४ गोरे किंमती प्रत्येकी १२ हजार रूपये प्रमाणे ४ लाख ८० हजार रूपये, १ लाल रंगाचा बैल किंमती १५ हजार रूपये व १ काळ्या रंगाचा बैल किंमती १५,हजार रूपये आणि वाहन क्र. एम एच. ४०/सी.डी.-२१४८ ची किंमती १५ लाख रूपये असा एकुण २० लाख १० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त केला.

          जनावरे कत्तली करीता निर्दयतेने,अवैध्यरित्या,कुरतेने बांधून व वाहनामध्ये कोंबून मिळून आल्याने.आरोपी नामे- 1) झनकलाल हिरेदेशसिंग मरकाम वय ३३ वर्ष,रा. नालंदा नगर नारी रोड नागपूर, २) शेख अय्यूक शेख भूरू,वय ४२ वर्ष,रा.कपील नगर नागपूर, ३) जगदीश भिमराव लिंगायत, रा. कामठी नागपूर श, ४) शाहनवाज रा. कामठी, ५) शाहनवाज याचा मित्र यांचेविरूद्ध पो.स्टे.कन्हान येथे वरील आरोपीविरुध्द कलम ११(१), ११ (१) (क), ११(१) (म), ११(१), ११(१) (प),प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० सहकलम ५(अ), ५(व), महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम,सहकलम १९९५ सहकलम ११९ म. पो. का ४२९, १०९, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

          आरोपी क्र. १) व २) यांना अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सतिश फुटाणे हे करीत आहे.

        सदरची कार्यवाही श्री.हर्ष ए.पोद्दार (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर,श्री.संदीप पखाले,अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन कन्हान येथील पोलीस निरीक्षक सार्थक नेहते,सहाय्यक पोलीस निरीक्षक फुलझेले,पोलीस हवालदार सतिश फुटाणे,पोलीस अंमलदार आशिक कुमरे,प्रशांत रंगारी,निखिल मिश्रा,सम्राट वनपरती,कोमल खैरे यांनी केली.