युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर नगर परिषद निवडणुकीचा निकाल अलीकडेच जाहीर झाला असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने विरोधकांना चारीमुंड्या चिट करत नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला नगराध्यक्ष म्हणून सौ मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांचा अडीच हजार मतांनी विजय झाला. तर २५ पैकी १७ नगरसेवक निवडून आले.
या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विजयात पक्षाचे नेते तथा खासदार बळवंत वानखडे, दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती,खरेदी विक्री संघ, सहकार म्हणून काँग्रेस पदाधिकारी, तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व शहर अध्यक्ष आतिश शिरभाते यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नियोजनबद्ध संघटन याचा मोलाचा वाटा आहे.
या सर्वांचे सूक्ष्म नियोजन सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा आशिष शिवाजीराव देशमुख(शिवरकर) यांच्या मार्गदर्शनात 12 प्रभागात 25 वार्ड मध्ये बूथ समिती स्थापन करून 125 सक्रीय युवा कार्यकर्ते यांचे संघटन करून त्याच्या द्वारे मतदारापर्यंत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पोहचण्यात यशस्वी झाले व आज नगराध्यक्ष यांचा अडीच हजार मतांनी विजय झाला, असे मत शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आतिश शिरभाते यांनी व्यक्त केले.
यामुळेच दर्यापूरात काँग्रेस पक्षाच्या विजयात बुथ नियोजन हा महत्वाचा मुद्दा ठरला आहे.



