युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर शिक्षक पतसंस्था मर्या र. न 502 ची अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार पदाची निवडणूक नुकतिच शिक्षक पतसंस्था दर्यापूर च्या कार्यालयात पार पडली.
समता पॅनल व प्रगती पॅनल मध्ये लढत झाली त्यात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका सरचिटणीस डी.आर.जामनिक हे अध्यक्षपदी उपाध्यक्षपदी करिता पदविधर शिक्षक संघटनेचे विभागीय संघटक अशोक बावनेर तर मानद सविव पदा करिता प्रशांत गहले, खजिनदार पदी सुनिल स्वर्गीय हे प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारावर मात करुन निवडून आले.
या विजयाचे सर्व श्रेय अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक बँकेचे संचालक संजय नागे, तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्था चे संचालक संजय साखरे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघांचे मार्गदर्शक पंडितराव देशमुख, अखिल शिक्षक संघांचे तालुका अध्यक्ष सतिश वानखडे, कार्याध्यक्ष सुरेंद्र पतींगे कोषाध्यक्ष राजू सावरकर, तसेच शिक्षक पतसंस्था चे माजी अध्यक्ष बाळासाहेब पावडे, माजी अध्यक्ष धनपाल गजभिये, माजी उपाध्यक्ष विनायक चव्हाण,जेष्ठ मार्गदर्शक रत्नाकर करुले,विजय पवार, राजेंद्र मालोकार, विलास पेठे, मधु चव्हाण, संजय बोबडे,रवींद्र राठोड यांना दिले जात आहे.सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, खजिनदार यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पंडितराव देशमुख सतिश वानखडे, संजय नागे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शिक्षक पतसंस्थाच्या निवडणुकीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी हुरबळे,निलेश वानखडे, तसेच सुभाष निमकर्डे, कडू व्यवस्थापक यांनी काम पाहिले.



