Home शैक्षणिक नांदगाव बिटस्तरीय प्राथमिक शालेय व सांस्कृतिक क्रीडा महोत्सव रोहना येथे उत्साहात संपन्न…

नांदगाव बिटस्तरीय प्राथमिक शालेय व सांस्कृतिक क्रीडा महोत्सव रोहना येथे उत्साहात संपन्न…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

       जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, रोहना येथे नुकताच नांदगाव बिटस्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजित करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धा मधे नांदगाव मांजरी म्हसला आणि शिवणी केंद्रातील केंद्रस्तरीय विजयी चमू सहभागी झाल्या होत्या.

       कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंकज फिसके, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती उपस्थिती होते.

         महोत्सवाचे उद्घाटन प्रसाद संकपाळ, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून निलेश ठाकरे , सहाय्यक गटविकास अधिकारी, अनिल कोल्हे, अविनाश आढाव, केंद्रप्रमुख, उपस्थित होते. 

          उद्घाटणीय सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिन अवघड यांनी केले तर प्रास्ताविक अनिल कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज मंडे यांनी पार पाडले.

         दोन दिवस विविध खेळ स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीने सर्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच काकडे होते.

        बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रध्दा सार्वे यांनी केल. तर आभार प्रदर्शन राजेंद्र बांडाबूचे यांनी केले.

         या महोत्सवातील जनरल चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा, शिवनी रसूलापूर यांनी पटकावून आपले खेळातील वर्चस्व सिद्ध केले.

        कार्यक्रमास शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.