“दिस जातील…….
दिस येतील…….
भोग सरल…..
सुख येईल……
या भोळ्या भाबड्या आशेवरच ‘आम्ही भारताचे लोक ‘ आला दिवस कंठीत आहोत गेल्या 75 वर्षांपासून.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी 1 जानेवारीला आपल्या शूरवीर पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावी जात असत. त्यातून त्यांनी संपूर्ण आयुष्यात याच पेशवाईच्या, मनुवाद्यांच्या विरोधात बौद्धिक लढाई लढून लोकशाही मूल्यांना आपल्या समाजासाठी कशी अविष्कारीत करता येईल यासाठी त्यांनी ऊर्जा मिळवीली. आणि संविधान निर्मिती करून आपल्या शूरवीर पूर्वजांचे व्याजासहित कर्ज फेडले…….
मग आम्ही आपल्या बापाच्या, महापुरुषांच्या उपकाराच्या कर्जाची परतफेड या नवीन वर्षात कशी फेडणार………?
का या उपकाराचे आम्हांला काहीही घेणे देणे नाही का……?
का मनुवाद्यांनी, RSS ने, मोहन भागवतने, मोदी / शहा / फसणवीस व त्यांच्या राजकीय मित्रपक्षांनी अर्थात संविधानविरोधी शक्तीने संविधानवाद्यासाठी निर्माण केलेल्या बौद्धिक, शारीरिक, आर्थिक, मानसिकरुपी हतबलतेच्या गुलामीत स्वतःची व पुढची पिढी बरबाद करण्यासाठी आम्ही व्यवस्थेला शरण जाणार का……..?
का या व अशा प्रकारच्या गुलामीला निमूटपणे शरण जाणे, हा सुद्धा आंबेडकरवाद समजून स्वतःच्या समाधानासाठी पुतळे आणि स्मारकासाठी पुष्पहार अर्पण करून मेलेल्या हृदयासोबत डोके टेकून वंदन करण्यातच धन्यता मानणार आहात का……..?
घाबरायचं काहीही कारण नाही…….
कारण, हे नाटक करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा तुम्हांला बाबासाहेबांनी संविधानातून प्रदान केलेले आहे………..!
हे आवाहन केवळ हृदय असलेल्यांसाठीच आहे. हृदय मेलेल्यांसाठी अजिबात नाही.
मी अशक्त आहे, मी कमजोर आहे, मी गरीब आहे, माझ्या हातून काय होणार आहे? असं स्वतःला समजून नतधैर्य अर्थात निराश होऊ नका. तुम्हांला जे दिसतं ते शेजाऱ्यांना सांगा, पाजाऱ्यांना सांगा, मित्रांना सांगा, नातेवाईकांना सांगा. ते न सांगता तुम्ही मौन धारण करत असाल तर तुम्ही भावी पिढीचे खुनी आणि गुन्हेगार ठराल. “
—-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी तर खुनीही होणार नाही आणि गुन्हेगारही होणार नाही. मी माझ्या बापाचे व महापुरुषांच्या कर्ज फेडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत या मनुवाद्यांच्या विरोधात लढणार…………!
तुम्ही……….?



