मुनघाटे महाविद्यालयात जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न..  

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधी 

        श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जी.सि.पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

           या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विना जम्बेवार,डॉ.आर. पी.किरमिरे उपस्थित होते.

         याप्रसंगी तरुणांनी एड्स रोगाबाबत जनजागृती केली. याप्रसंगी शारीरिक बदल,मैत्री तसेच शारीरिक आकर्षण,मनावरील नियंत्रण, शरीरातील बदल इत्यादी बाबत मार्गदर्शन यांनी केले.किशोरवयीन मुलींनी शरीरातील बदल व शरीर स्वास्थ्य बाबत निगा राखावी व गैरमार्गापासून दूर राहावे,यातच कुटुंबाचे व समाजाचे हित आहे असे सांगितले आणि एच.आय.व्ही विषाणू व एड्स रोग याबाबत माहिती दिली.

           कार्यक्रमाचे संचालन रा.से. यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रियंका पठाडे यांनी मानले.याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.वाघ सर,प्रा नितेश पुण्यप्रेडीवार,प्रा.वाळके,डॉ.मुरकुटे,डॉ.लांजेवार गीता,प्रा.गिता भैसारे,प्रा.तोंडरे,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.