भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्रौ नऊ च्या सुमारास धानोरा छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रक सालेभट्टी या गावाजवळील पडलेल्या खड्ड्यामध्ये एम एच 34 बी झेड 4577,व एम एच 33 डब्लू 3330 या क्रमांकचे दोन ट्रक व अन्य ट्रक फसले असल्यामुळे वाहतूक दिनांक रात्रौ पासून पूर्णपणे ठप्प पडली आहे.
त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या सहा किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.मुरूमगाव वरून गडचिरोली ला येणारी हालटिंग बस सुद्धा अडकून पडली आहे.
त्यामुळे विध्यार्थी आज सकाळच्या साळेपासून वंचित राहावे लागले त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला धानोरा ते मुरूमगाव छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 या रोडवर सालेभट्टी पासून ते जपतलाईपर्यंत या सात किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते.
त्यामुळे रस्ता दुरुस्ती साठी काही दिवस जड वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रस्त्याची डागडुजी करण्यात आली व पूर्ण जडवाहू याच मार्ग धानोरा छत्तीसगड मार्गाने सुरू करण्यात आली.
या तीन दिवसाच्या अवकाळी पावसाने ज्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती केला त्याच ठिकाणी परत पुन्हा अजून गड्डे पडून दोन ट्रक एकाच ठिकाणी तर एक ट्रक त्याच्याआधी फसला आहे असे तीन ट्रक रस्त्यावर फसलेले आहेत त्यामुळे वाहतूक काल रात्र पासून बंद आहे.
दुचाकी सरांना आपली वाहने काढताना वाहनांना आपले वाहन काढत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात सालेभट्टीच्या गावाच्या आधी पडलेल्या खड्ड्यात दोगावाच्या आधी तीन ट्रक फसले आहे.
रात्रौ पासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे चार चाकी वाहनांना तसेच दुचाकी वाहनांना सुद्धा आपले वाहन काढताना रस्त्याच्या कोणत्या बाजूने काढावे व कोणता खड्डा चुकवावा हा प्रश्न चालकासमोर पडतो हा मार्ग छत्तीसगड राज्याला जोडणारा असल्यामुळे सुरजागड ते छत्तीसगड ला जाणारे अवजड वाहन याच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 धानोरा वरून छत्तीसगडला जात असतात या अवजड वाहनामुळे धानोरा सालेभट्टी ते जपतलाईपर्यंत च्या डांबरीकरणाचा अक्षरशः चुरा झालेला आहे त्यामुळे रस्ता अक्षरशः चिखलमय झाला आहे.
त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या दिनांक ४ व 13 सप्टेंबर सुद्धा याच ठिकाणी दोन ट्रक फसले होती त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती धानोरा छत्तीसगड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक फसण्याचा सिलसिला सुरू आहे.



