Home देशविदेश नागरिकांचे व लोकशाहीचे दमन करण्यासाठीच,”राजकीय पक्षांनी अलोकशाही तत्वाचे बेजबाबदार चित्र रेखाटले…‌ ...

नागरिकांचे व लोकशाहीचे दमन करण्यासाठीच,”राजकीय पक्षांनी अलोकशाही तत्वाचे बेजबाबदार चित्र रेखाटले…‌ — नागरिकांशी रुपयांचा खेळ खेळताना स्वतःसह स्वतःच्या समाजाला गुलाम बनविले,अस्तित्वहीन केले…..

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

          विकास म्हणजे काय आणि स्वतःचे अधिकार व अस्तित्व म्हणजे काय? याबाबत अनभिज्ञ असलेल्या मतदारांची फसवणूक निवडणूका अंतर्गत सातत्याने सुरू आहे..

           या देशातील प्रोढ नागरिकांना मताधिकार यासाठी देण्यात आला की त्यांनी स्वतःच्या अधिकाराचे व अस्तित्वाचे संरक्षण करावे.

               परंतू सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत बेजबाबदार राजकीय पक्ष व त्यांचे बेजबाबदार उमेदवार हे प्रोढांचा मताधिकार चंद रुपयात विकत घेतात आणि लोकशाही मुल्यांशी धोकाधाडी करतात हा एकप्रकारे राष्ट्रद्रोहच आहे व हा राष्ट्रद्रोह देशाच्या सर्व भागात उन्माद करीत आहे…

          रुपयांच्या बलावर निवडून येणाऱ्या उमेदवारांची लोकसंख्या राहात नाही,त्यांच्या बाजूने मतदार राहात नाही आणि त्यांना लोकांच्या समस्यांची,अधिकाराची व अस्तित्वाची जाणीवही राहात नाही…..

              तद्वतच लोकसभा,विधानसभा,महानगरपालिका,नगरपालिका, नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपंचायत,ग्रामपंचायत येथे बेअक्कल,अकलशुन्य व हुजरेगिरी करणारे चालाख अक्कलबाज दलाल हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात,तेव्हा लोक जिवंत असून संपलेले असतात.याचबरोबर भ्रष्ट मार्गाने खासदार व आमदार निवडून येताना देशाची लोकशाही धोक्यात आलेली असते.

           लोकशाही धोक्यात आलेली असते म्हणजेच काय तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे लोकांच्या हितासाठी सर्वोतोपरी उत्तम कर्तव्य पार पाडत नाही,संघर्ष करीत नाही,रस्त्यावरची व सभागृहातली लढाई हिरहिरिने आणि जिव्हाळ्याने लढत नाही.

          एवढे नेभळट व भेकड असलेले लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार,आमदार,नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य हे पक्ष प्रमुखांच्या व सत्ता प्रमुखांच्या ताब्यातले मानसिक गुलाम असतात,तेव्हा ते जनतेसाठी व जनतेचे राहात नाही.

       रुपये देऊन मत विकत घेतले की लोक आपल्या अधिकाराची व अस्तित्वाची खरी लढाई लढत नाही,लोकप्रतिनिधींना आपल्या समस्याबाबत व अधिकाराबाबत प्रश्न विचारत नाही.ते चूप राहतात.‌‌..

              उलट मतदार हे देशातील नागरिक असताना भिती मनात ठेऊन लोकप्रतिनिधींकडे जातात व आपल्या समस्याबाबत अधिकार वाणीने त्यांच्यापुढे बोलत नाही ‌हे,”मानुष्कीच्या हिनतेचे चित्र भारतातील राजकीय पक्षांनी,भारतीय लोकशाहीचे व नागरिकांचे दमन करण्यासाठी रेखाटले आहे…

मतांची चोरी व मतांचा गैर उपयोग.‌.‌.‌

         आता तर मतचोरीचा नवीनच किस्सा जनतेपुढे आला आहे.मतदार याद्यात बोगस मतदारांचे नाव घुसवणे आणि आपल्या पक्षाच्या लोकांच्या मदतीने बोगस मतदान करुन खासदार व आमदार आणि इतर प्रकारचे उमेदवार निवडून आणणे होय.

            या बोगस मतावर निवडणूक आयुक्त बोलत नाही आणि सत्तापक्ष हरकत घेत नाही.विरोधी पक्षांनी हरकत घेतली तर निवडणूक आयुक्त लक्ष देत नाही.यामुळे निवडणूक आयुक्तांना व सत्ता पक्षांना,”बोगस मतदारांचा कुणासाठी व कुणाच्या हितासाठी सार्वत्रिक निवडणूकांत उपयोग करायचा असतो,हे त्यांनी भारतासह जगापुढे आणले पाहिजे.

             पण,”अशा लोकशाही विरोधी कपट नितीद्वारे, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूका घेण्याची आणि सत्तापक्षाचे लोक निवडून येण्याची परंपरा रुढ झाली तर हे भ्रष्ट लोकप्रतिनिधी (खासदार/ आमदार) स्वतःसह स्वतःच्या समाजाचे अतोनात नुकसान करणार व स्वतःसह स्वतःच्या समाजाला गुलाम बनवणार हे आता स्पष्ट झाले आहे.

            म्हणूनच ईव्हीएमच्या माध्यमातून बोगस मताद्वारे निवडण येणारे काही लोकप्रतिनिधी हे धर्म,वैयक्तिक व जातीविशेषणातंर्गत खालच्या पातळीवर सातत्याने बरगळत असतात,असे लक्षात येते आहे.

          कारण,असे बरगळणारे लोकप्रतिनिधी हे आपल्या पक्ष मालकाचे,प्रधानमंत्री मालकाचे,मुख्यमंत्री मालकाचे आधिच गुलाम झालेले असतात हे लपून राहिलेले नाही.

          सार्वत्रिक निवडणूकीत रुपयांचा होणारा वापर जसा लोकशाहीसाठी व नागरिकांसाठी धोकादायक आहे.तसेच रुपयाच्या माध्यमातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी हे बेजबाबदारपणे लोकशाहीचे व नागरिकांचे दमन,शोषण करणारे असतात.

              कारण लाचार,कर्तव्यहिन,अर्थहिन,अशिक्षित,अज्ञानी,बेबस,बेरोजगार मतदार मत देण्याचे रुपये घेतात.म्हणूनच बेजबाबदार व लायकी नसलेले लोकप्रतिनिधी निवडून येतात हे देशासाठी व देशाच्या लोकशाहीसाठी घातकच!…