भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
आ डॉ.मिलिंद नरोटे यांनी आज निमगाव ग्रामस्थांशी संवाद साधून गावातील विविध समस्यांची माहिती घेतली.
ग्रामस्थांनी रस्त्यांची व पांदण रस्त्यांची दुरुस्ती, बस सेवेसंबंधी अडचणी, वनपट्टा धारकांना, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, शेतकरी कर्जबाजारीपणा, अपंग बांधवांसाठी इलेक्ट्रिक सायकलची गरज, ७/१२ नावे व पिण्याच्या पाण्याच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
तसेच सेमी इंग्लिश शिक्षण शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्थिती जाणून घेतली आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
काही तातडीच्या समस्या फोनद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून तत्काळ मार्गी लावल्या.ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.
भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा सचिव सारंगजी साळवे, माजी जि.प. सदस्य सिन्नू दुल्लमवार, सरपंच सौ. छाया कुमारे, उपसरपंच चेतन सुरपाम, ता. महामंत्री सुभाष धाईत,शुभाष खोबरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष सौरव सहारे, भूषण कुकुडकर व ग्रामस्थ सहकारी उपस्थित होते.



