मुख्याध्यापक दिलीप पाडुळे यांची सेवापूर्ती निरोप.. — त्या जागेवर भारत कोरडकर सर यांनी स्विकारला मुख्याध्यापक पदाचा पदभार..

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 1

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील कैलासवासी लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयात तीन शिक्षकांचा सेवापुर्ती निरोप समारंभ संपन्न झाला.

सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापक दिलीप पाडुळे बोलत आसताना म्हणाले की. कैलासवासी लोकनेते बोडके दादांचा आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे विद्यालयात कोणत्याच गोष्टीची कमतरता झालेली नाही. 32 वर्ष मी सेवा शाळेची करीत आसताना पालकांनी आगर सर्व संचालक मंडळांनी माझ्यावर विश्वास दाखवला छोट्याशा रोपट्याच वटवृक्ष करून आज दहावीपर्यंत याच विद्यालयात भागातील सर्व विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याचा मला आज आनंद आहे. गावातील व याच भागातील पालक व ग्रामस्थांनी माझ्यावर चांगले विश्वासाने प्रेम व आदरही केला, सेवानिवृत्तीनंतर दिलीप पाडुळे बोलत होते.

विद्यालयातील मुख्याध्यापक दिलीप तुकाराम पाडुळे यांनी 32 वर्ष सेवा केली.,, आरुण यशवंत सूर्यवंशी यांनी 27 वर्ष सेवा केली.,, तसेच रामचंद्र नारायण शेंडगे यांनी 28 वर्ष या विद्यालयातक्ष सर्व शिक्षकांनी शिक्षणनाची सेवा केली. हे आज तीनही शिक्षक शिक्षण सेवेतून सेवा निवृत्त झाले.

याबद्दल माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी आपले विचार व्यक्त करीत आसताना म्हणाले की. कैलासवासी लोकनेते बोडके दादांचे आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे याच विद्यालयाचा मिच विद्यार्थी होतो. तर आज मि सरपंच झालो. याचा विसर कधीही पडू देणार नाही. गुरुवर्य दिलीप पाडुळे सर यांनी 32 वर्ष याच विद्यालयात सेवा केली याचा मला मोठा आनंद आहे. कारण लहान रोपट्याचं वटवृक्ष करून आज ते फुलविले आहे. या भागातील सर्व विद्यार्थी विद्यालयात शिक्षण घेत आहेत. लहान पणापासून मीही सरांच्या मार्गदर्शनाखाली लहानाचा मोठा झालो. पिंपरी बुद्रुक गावचा आदर्श सरपंच झालो. एवढ मोठे या विद्यालयात मला सरांच्या माध्यमातून शिकायला मिळालं हे मी भाग्य समजतो. माजी सरपंच श्रीकांत बोडके यांचे यावेळी उद्गार

  सर्व संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्षा सुभद्राबाई महादेव बोडके यांच्या मार्गदर्शनाने व माजी सरपंच श्रीकांत बोडके ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके यांच्या प्रयत्नाने चालत आसलेली शिक्षण संस्था आसून विद्यालयामध्ये 15 शिक्षक, 5 शिक्षिका, व ऑफिशियल कर्मचारी 5 आसून एकूण शिक्षक 20 पैकी 3 शिक्षक आज या विद्यालयातून सेवानिवृत्त झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप तुकाराम पाडुळे, आरुण यशवंत सूर्यवंशी, रामचंद्र नारायण शेंडगे हे तीन शिक्षक 27 ते 32 वर्षांनी सेवानिवृत्ती झाले. शेवटी निरोप समारंभ घेत असताना तीनही शिक्षकाने आपले विचार व्यक्त केले.

यानंतर नूतन मुख्याध्यापक म्हणून भरत परमानंद कोरटकर सर यांनी पदभार स्वीकारला,

या कार्यक्रमासाठी प्रमुख संस्थापक अध्यक्षा सुभद्राताई महादेव बोडके,विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके,माजी ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके, उपसरपंच पांडूरंग बोडके, प्रभाकर बोडके, बबन बोडके , लालासाहेब बोडके, हिरालाल सूळ, आशोक बोडके, वर्धमान बोडके, बाळासाहेब घाडगे, सुदर्शन बोडके,सर्व ग्रामस्थ विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी आदी सर्व उपस्थित होते.