विश्वशांती विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा..

  सुधाकर दुधे 

सावली प्रतिनिधी

      भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे वर्ग ५ ते १२ मध्ये नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.शाळा प्रवेशोत्सव गेल्या काही वर्षापासून शिक्षण विभागाच्या सूचनानुसार प्रत्येक शाळेला हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.त्याच अनुषंगाने विश्वशांती विद्यालयात भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलजी स्वामी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार यांचे उपस्थितीत प्रवेशोत्सव २०२३-२४ हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली.विद्यालयातील सर्व शिक्षकांनी नव्याने प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा शाळेत आल्याचा प्रचंड उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.