आळंदीत माऊलींच्या चांदीच्या रथाला जुपण्यांत येणाऱ्या मानाच्या बैलजोडीची मिरवणूक. 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ साठी माऊलींच्या चांदीच्या रथाला जुपण्यांत येणाऱ्या मानाच्या बैलजोडीची सेवा यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले कुटुंबाला मिळाला आहे. त्यानिमित्ताने मानाच्या बैलजोडीची आळंदीत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

बैलजोडीचे सेवेकरी तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांच्या राहत्या घरापासून वडगाव रोड वरुन मिरवणुकीची सुरुवात झाली. यावेळी सुरवातीला भोसले कुटुंबातील महिला भगिनींनी बैलजोडीची औक्षण करून पुजन केले. वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करून विविध ठिकाणी मानाच्या बैलजोडीचे औक्षण आणि पुजन करुन मिरवणुकीचा समारोप महाद्वार चौकात झाला. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने बैलजोडीचे वेद मंत्रांच्या उच्चारात विधिवत पूजन करण्यात आले.   

यावेळी बैलजोडीचे सेवेकरी तुळशीराम भोसले, रोहीत भोसले यांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, पालखी सोहळामालक हभप राजाभाऊ पवार, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रमेश पाटील, मच्छिंद्र शेंडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, चेअरमन दिलीप मुंगसे, शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, विलास घुंडरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहीले, रमेश कुऱ्हाडे, विष्णू वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, संतोष भोसले, गोपीनाथ भोसले, पांडुरंग भोसले, शैलेश रानवडे, प्रफुल्ल प्रसादे, राहुल जोशी, सोमनाथ वाघमारे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, उमेश रानवडे व आळंदीकर ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. येत्या १२ जून ते १२ जुलै दरम्यान श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर व पंढरपूर ते आळंदी असे ३१ दिवस भोसले कुटुंबाचे हे मानाची बैलजोडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ ओढणार आहे.