वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे खेलो इंडिया मध्ये सुयश..

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

      साकोली -उत्तर प्रदेश येथे खेलो इंडिया विद्यापीठ खेळ स्पर्धेत ग्रेइको रोमन कुस्ती प्रकारात वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली चे बी.पी.ई. अंतिम वर्षाचा विद्यार्थी तरुण वत्स ने दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले. स्पर्धेत पुरुषांच्या गटात राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालाचा विद्यार्थी तरुण वत्स जे के यु विद्यापीठाच्या रविला मात देत सुवर्ण पदक प्राप्त केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी प्रा. डॉ जितेन्द्र कुमार ठाकुर प्रा. नीरज अतकरी, डॉ. राजश्री, देवेंद्र इसापुरे व सहयोगी प्राध्यापकांना दिले. तरुण वत्स ने केलेल्या कामगिरी बद्दल संस्थापक अध्यक्ष डॉ ब्रम्हानंद करंजेकर, सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य , सहयोगी प्राध्यापक त्याचबरोबर पुकराज लांजेवार, शाहीद सय्यद, दिव्या कुंभारे, रश्मी टिकेकर, वनिता देशमुख यांनी त्याचे अभिनंदन केले. वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने नेहमी क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान दिलेले आहे. प्रत्येक वर्षी वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय व राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात.