ब्रेकिंग न्युज… बोरीचक येथे बैलांवर वाघाचा हल्ला… — वाघाच्या हल्ल्यात दोन बैल जखमी.

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी

 दखल न्यूज भारत

 

आरमोरी :- गावालगतच्या जंगलात चरायला गेलेल्या दोन बैलांवर वाघाने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील बोरी चक येथे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण बावणे व ईश्वर राऊत यांच्या मालकीचे हे बैल आहेत. बैलाच्या गळ्याला गंभीर जखम झालेली आहे.

बोरी येथील लक्ष्मण बावणे व ईश्वर राऊत यांच्या मालकीचे बैल नेहमीप्रमाणे करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेले होते. त्याचवेळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून दोन्ही बैलास जखमी केले.

 दोन्ही बैल वाघाच्या तावडीतून कसेबसे सुटून घरी आले. तेव्हा घर मालकांनी बैलांची पाहणी केली असता त्यांच्या मानेवर व गळ्यावर तसेच पोटावर जखमा दिसून आल्या.

 याबाबतची माहिती शिरशीचे क्षेत्र सहाय्यक डी. डी. उईके यांना देण्यात आली. त्यांनी पशुपालकांच्या घरी भेट देऊन पाहणी केली असता वाघाने हल्ला केल्याचे निशाण दिसून आले.

 ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांचे बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच गावातील एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता.