कु- हा ग्रामपंचायत येथे राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

कैलास गजबे- करजगाव- प्रतिनिधी

चांदुरबाजार तालुक्यातील कु- हा या ठिकाणी राणी अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती कु- हा ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली यावेळी सरपंच अर्चना भुस्कडे उपसरपंच मुजीब खान,यावेळी ग्रा.प.सदस्य क्राती राऊत,गजानन मानकर,राम वानखड़े हे हजर होते अजय राऊत, शिवम आकोलकर अंगनवाडी सेविका मदतनिस गावातील मान्यवर व्यक्ती ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

       सरपंच उपसरपंच व मान्यवराच्या हस्ते राणी अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले भावना सतिश काळे व मंगला सुनिल ढाकुलकर यांना या वर्षीच्या राणी अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सरपंच अर्चना भुस्कडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी गावातील महीला पुरुष उपस्थित होते.