१० ते १५ वर्षापासुन बंन्द असलेला रस्ता कुऱ्हा ग्रामपंचायतने केला मोकळा..

कैलास गजबे- करजगाव प्रतिनिधी

     चांदुरबाजार तालुक्यातिल कुऱ्हा या ठिकाणी सरकारी दवाखाना व सुतिकागृहकडे जाणारा रस्ता बरेच वर्षा पासुन बंन्द होता.

 

        गावातील सरपंच अर्चना भुस्कडे आणि उपसरपंच मुजीब खान,गजानन मानकर ग्रा.प.सदस्य,मंडळ अधिकारी,संजय चौधरी तलाठी,सचिव काळे यांनी तो रस्ता आज मोकळा केला.

       यावेळी पुनम राऊत,अजय राऊत,शिवहरी मानकर, अरविंद शेटे,निलेश भुयारकर,शिवम आकोलकर,सुरेश कोहर,अक्षय मानकर ग्रामपंचायत कर्मचारी,मोहन मानकर,अविनाश कोहर,योगेश राऊत हे हजर होते यावेळी गावातील महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.