दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
तसेच ०१ मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तंबाखू मुक्तीच्या संकल्पनेची शपथ सुद्धा याप्रसंगी घेतली.
०१ मे. २०२३
गडचिरोली:- आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्तेे ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साजरा केला.तसेच या महाराष्ट्र दिनानिमित्ताने तंबाखू मुक्तीच्या संकल्पनेची शपथ याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली.
खासदार महोदयांनी याप्रसंगी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या..
यावेळी प्राचार्य दुर्गम सर,प्रा.वाटेकर सर,प्रा.झाडे सर,प्रा.रोहनकर मॅडम, प्रा.मानकर सर,शिक्षकेतर कर्मचारी वृंद प्रवीण कांबळे,शेट्टे,विनोद रोहनकर,राकेश संतोषवार तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.