दोन वाघाच्या लढाई  मध्ये एकाचा अंत..

 

दखल न्युज भारत

चिखलदरा तालुका प्रतीनीधी

अबोदनगो चव्हाण

चिखलदरा-:

        गुगामल वन्यजीव विभागांतर्गत चिखलदरा वन परीक्षेत्रातील वैराट टुरिझम क्षेत्रात मृत्यू झालेल्या वाघाचे आज NTCA च्या मार्गदर्शक सूचनाना अनुसरून दिनांक 30 एप्रिल रोजी शव विच्छेदन करण्यात आले. 

         यावेळी चिखलदराचे पाशुवैद्यकीय अधिकारी डॉ.पुंड, सहाय्यक श्री. खान,MTR चे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. धांदर यांच्या द्वारे करण्यात आले.यावेळी NTCA आणि WII चे प्रतिनिधी म्हणून राकेश महल्ले,अलकेश ठाकरे उपस्थित होते.

       शवविच्छेदना अंति सदर वाघाचा मृत्यू हा दोन वाघा मधील आपसी लढाई मधून २९ एप्रिल ला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

       मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पावलेल्या वाघाचा आंतरिक रक्तश्रवामुळे मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनांती निष्पन्न झाले आहे.

        शवविच्छेदना नंतर सदर वाघाला NTCA च्या मार्गदर्शक सूचना नुसार श्री. सुमंत सोळंके उप वनसंरक्षक,गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा,श्री.मनोज खैरनार वि. व. अ. (मे. व्या. प्र.), श्री. इंद्रजित निकम स. व. स., श्री कमलेश पाटील स. व. स.,डॉ मयुर भैलुमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिखलदरा NTCA आणि WII चे प्रतिनिधी श्री. राकेश महल्ले, श्री. अलकेश ठाकरे, श्री. जयदीप पाटील, वनपाल श्री. कळसकर, श्री. साळवे, वनरक्षक श्री. शनवारे, श्री. शेलूकर यांच्या उपस्थिती मध्ये जाळण्यात आले.

सुमंत सोळंके,

उपवन संरक्षक

गुगामल वन्यजीव विभाग

चिखलदरा