इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आयोजित साखळी उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा….

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. इंद्रायणी नदीत कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी, महापालिका, नगरपरीषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील मैलायुक्त पाणी‌ सोडल्याने इंद्रायणी नदीत अतिशय प्रदूषण झाले आहे.हे सर्व रोखण्यासाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र दिनी आळंदी येथील माऊली मंदिराजवळ महाद्वार चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर,उत्तम गोगावले,शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर,माजी नगरसेवक आनंद मुंगसे,आशिष गोगावले,चारुदत्त रंधवे,अनिता झुजम,मंगेश तिताडे,शशी जाधव,भारती ताई वाघमारे,‌ योगिताताई धुमाळ,शुभांगीताई यादव,संतोषीताई पांडे, शैलाताई तापकीर,अनुसया संगेवार,वनिता उंडारे,राजश्री धुमाळ,संगीता मेटे,विद्या आढाव, कल्याणी मालक,नकुसा पुजारी, अभिषेक आढाव,ऋषिकेश लिपणे यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.