सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत.

 

युवराज डोंगरे/खल्लार

दर्यापूर दहीहांडा रोडवर सासन फाट्याच्या समोर गेल्या 6 दिवसापासून मुख्य रस्त्यावर बाभळीचे झाड पडलेले असून सार्वजनिक बांधकाम विभाग, दर्यापूर मात्र गाढ झोपेत आहे. याठिकाणी एखादा मोठा अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर पडलेले बाभळीचे झाड मुख्य रोडवरुन बाहेर काढेल काय?असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.