उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हातंर्गत काटोल तालुक्यातील मौजा राहुळगाव डोरली येथील एनर्जी कंपनी मध्ये सकाळी ७ वाजता ब्लॉस्ट झाला आणि या ब्लाॅस्टमध्ये होरपळून मरणाऱ्या १७ कामगारांच्या मृत्यूने परिसरात थरकाप उडाला!…
याचबरोबर १८ जन गंभीर असून त्यातील अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.सदर कंपनीमध्ये स्फोटके बारुद बनवण्याचे काम सुरू असताना,आज दिनांक ०१ मार्च २०२६ रविवार रोजी सकाळी ७ वाजल्यानंतर अचानक अनेक स्फोट झाल्याची माहिती आहे…
नागपूर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा आढावा घेतला.स्फोट झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीला नियंत्रणात आणण्याच्या कामाला सुरुवात केली होती.आता आग आटोक्यात आली आहे.
सदर कंपनीत स्फोट होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की,सदर कंपनीत अनेकदा स्फोट झाले आहेत आणि अनेक कामगारांनी प्राण गमावले आहेत.
यामुळे कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.मात्र स्फोट कशामुळे झाला यासंबंधाने दुर्घटनेची चौकशी सुरू आहे.
दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबे निराधार झाली असून,कुटुंबातील कर्ते पुरुष स्फोटात मृत्यू पावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले आहे,शोककळा पसरली आहे.


