Home Breaking News ब्रेकिंग न्यूज…. — रात्रोच्या वेळी वाळूची दाबून चोरी,कपर्ला येथील वाळू भरलेले...

ब्रेकिंग न्यूज…. — रात्रोच्या वेळी वाळूची दाबून चोरी,कपर्ला येथील वाळू भरलेले ट्रॅक्टर केले चिमूर तहसील कार्यालयात जमा…. — मधूकर दडमल बापलेक करतात मागील चार महिन्यांपासून वाळूची चोरी!…. — जांभुळघाट येथील पटवारी उमेश भांदेकर यांनी केलाय नागरिकांसमोर वाळू भरलेल्या ट्रॅक्टरचा जप्तीनामा…

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

     चिमूर तालुकातंर्गत मौजा कपर्ला येथील रहिवासी असलेले श्री.मधूकर दिवाकर दडमल हे विना राॅयल्टी वाळूची चोरी रात्रोच्या वेळी करीत असताना,मौजा कोटगाव येथील तरुणांनी त्यांचे वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडून ग्रामपंचायत कोटगाव जवळ उभे केले.

             सदर घटना दिनांक १८/०५/२०२६,रोज सोमवार च्या रात्रो ११ ते ११.४५ वाजताच्या दरम्यानची आहे.वाळू भरलेल्या ट्रॅक्टर चा क्रमांक MH.34,B.R.3582 असून ट्रॅक्टर चालकाचे नाव नितेश जिवतोडे आहे.

       भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या भांदवी कलम ५१ नुसार नागरिकांना त्यांच्या जवळपासच्या आणि त्यांच्या क्षेत्रातील गौण खनिज असलेल्या वाळूचे रक्षण करण्याचा अधिकार आहे.याचबरोबर वाळू चोरीची चोरटी वाहतूक बंद करण्याचे अधिकार सुध्दा नागरिकांना आहेत.

            याच अधिकाराचा चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथील तरुणांनी केला असून संबंधित महसूल अधिकारी आणि पोलिस अधिकारी उत्तम कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा मौजा कोटगाव येथील नागरिकांना आहे.

        चिमूर तहसीलचे तहसीलदार श्रिधर राजमाने व भिसी पोलिस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांना घटनेची माहिती दिली होती.

              जांभुळघाट तलाठी उमेश भांदेकर हे मौजा कोटगाव येथे रात्रो साडेबारा वाजताच्या दरम्यान आले व वाळू भरलेल्या ट्रॅक्टर चा जप्ती पंचनामा नागरिकांसमोर करुन,तहसील कार्यालय चिमूर येथे वाळू भरलेला ट्रॅक्टर रात्रोलाच जमा केलाय.

          मौजा कोटगावच्या सभोवताल असलेल्या नदी पात्राला वाळू चोरांनी अक्षरशः पोखरून काढले आहे.