Home Maharashtra अनुसूचित जाती विभागाच्या ब्लाॅक अध्यक्षपदी माजी प.स.उपसभापती स्वप्निल मालके यांची नियुक्ती… ...

अनुसूचित जाती विभागाच्या ब्लाॅक अध्यक्षपदी माजी प.स.उपसभापती स्वप्निल मालके यांची नियुक्ती… — राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली नियुक्ती!..

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

        संघटन सृजन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हा – जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी घेऊन काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून,दिलेल्या अहवालानुसार प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या चिमूर विधानसभा ब्लॉक अध्यक्षपदी चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वप्निल नारायण मालके यांची नियुक्ती करण्यात आली.

         स्वप्निल नारायण मालके हे अनुभवी राजकारणी असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.त्यांना पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने ते आपल्या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा पक्ष पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आहे.

             त्यांची चिमूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने,पक्ष पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्र परिवार,आप्त यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.