युवराज डोंगरे
उपसंपादक/खल्लार..
दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी आज (17 में ला) दर्यापूर आगाराला अचानक भेट देऊन आगारातील कर्मचारी यांनी आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी आमदार समोर मांडल्या.दर्यापूर आगाराचे आगार व्यवस्थापक हे दर्यापूर येथिल रहिवासी असल्यामुळे हुकुमशाही पद्धतीने कर्मचाऱ्यासोबत वागून कर्मचाऱ्याचे आर्थिक नुकसान करीत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या रजा बिनपगारी मंजूर करणे,रजा पेंडीग ठेवणे व दोन महिन्यांचा कालावधी गेला की त्या रजा गहाळ करने,असे वर्तन आगार प्रमुखांचे कर्मचाऱ्यांसोबत आहे.त्याबाबत जाब विचारला की,त्या कर्मचाऱ्यास खोटे प्रकरणात गोवुन दंडात्मक कारवाई करण्यात येते.
कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा आमदार गजानन लवटे यांचे समोर मांडल्या असता आगार प्रमुखांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
अंजनगाव मार्गावरील दररोज दोन ते तीन बस फेऱ्या दररोज रद्य होत असुन प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबत आमदार यांनी जाब विचारला असता कर्मचाऱ्यांमुळे होतात अशी खोटी माहिती दिली. प्रत्यक्षात अंजनगावच्या फेऱ्या रद्द करुन अकोट व अमरावती येथे जादा फेऱ्या काढल्या जातात.एसटीचे चालक,वाहक व यांत्रिक कर्मचारी वाढत्या तापमानातही प्रवाशांची सेवा करीत आहे अशा परीस्थिती आगार प्रमुख हे आर्थिक नुकसान करुन दम दाटीची वागणुक देत आहे,त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.
दोन महिने अगोदर चालक रमेश मानकर यांनी विभागीय कार्यालय अमरावती येथे आपल्या सहकाऱ्यांसह आमरण उपोषण केले होते.आगार प्रमुख आशिष बाहुलकर यांना दर्यापूर डेपोला तीन वर्षे पूर्ण झाली आहे.त्यांची प्रशासकीय बदली होणे गरजेचे आहे. व त्यांच्या हुकुमशाही कारभारामुळे कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या बदलीची मागणी केली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर त्यानी सुद्धा बसेसच्या अनियमेत्तेबाबत आगार व्यवस्थापक बाहुलकर यांना चांगलेच धारेवर धरले.
आमदारांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकुन घेऊन न्याय मिळवून देण्याबाबत ग्वाही दिली.आगारातील कर्मचारी रमेश मानकर,दिनेश गवई,आषिश उखळकर,सचिन वडाळकर,योगेश कोकाटे यांनी आमदार गजानन लवटे यांचे आभार मानले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर,शिवसेना विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर,युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरे,किशोर टाले,गुणवंत पाटील गावंडे,दिपक बगाडे,गोपाल खलोकर,अनिकेत खाडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.



