Home Maharashtra बब्बू खान यांची चिमूर अल्पसंख्याक ब्लाॅक अध्यक्षपदी नियुक्ती..‌. — राष्ट्रीय काँग्रेस...

बब्बू खान यांची चिमूर अल्पसंख्याक ब्लाॅक अध्यक्षपदी नियुक्ती..‌. — राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे नियुक्ती…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

      संघटन सृजन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्हा – जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी घेऊन काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून,दिलेल्या अहवालानुसार प्रांताध्यक्ष श्री.हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी व ब्लॉक कार्याध्यक्षपदी महाराष्ट्र राज्यात नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

        अल्पसंख्याक सेल च्या चिमूर ब्लाॅक अध्यक्षपदी व ब्लाॅक कार्याध्यक्षपदी बब्बू शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.