राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील देवसरा – मेंढा – खांबाळा हा मुख्य संपर्क मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तसेच डांबरीकरण पूर्णपणे नष्ट झालेले आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच शेतकरी ये-जा करीत असतात.
मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतूक धोकादायक व कष्टदायक बनली आहे या मार्गावर पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून वाहतूक जवळपास ठप्प पडते.
यासंदर्भात आज आमदार रामदास मसराम हे कूरखेडा दौऱ्यावर असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीचे हेमंतकुमार मरकाम यांनी त्यांची भेट घेत निवेदनाद्वारे सदर समस्या त्यांचासमोर मांडली व याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. याबाबत संबंधित विभागाकडे आवश्यक पाठपुरावा करीत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार मसराम यांनी दिले.



