“दृष्टी तशी सृष्टी ‘ अशी म्हण आहे,याचा अर्थ दृष्टी म्हणजे नजर.नजर स्पष्ट किंवा अंधुक असेल तर परिसर तसाच दिसणार.हे झाले भौतिक पाहणे.असेच विचाराचे पण आहे.आपले विचार अंधुक किंवा स्पष्ट असण्यानुसार तसे दिसते.शिवाय जे आणि जसे विचार तसाच दृष्टिकोन बनते.दृष्टिकोन याचा अर्थ जगाला आपल्या दृष्टीने पाहणे,म्हणजे जसे आपले विचार तसे जग दिसते.हे सारे विचार करण्यावर अवलंबून आहे.उदा.गरीबी,बेकारी,भ्रष्टाचार,महागाई,याची कारणे जी ऐकून माहिती असतील तीच खरी मानणे,तसेच देव,धर्म,अंधश्रद्धा याबद्दल लहान पानापासून जे संस्कार मनावर विचारावर झाले,तेच मानून चालणे,आपल्या आयुष्याचा सारा खेळ,पहिल्या जन्मातील पापकर्म,पुण्यकर्म यानुसार चालतो,आपण ज्या जातीत,धर्मात,गरिबीत,श्रीमंतीत जन्मास आलो,याचे कारण नशीब,दैव मानणे,म्हणजे अशा विचाराची जडण घडण होणे,आणि त्यावर विश्वास ठेऊन आपले आयुष्य कटविणे,यास पारंपरिक दृष्टीकोन म्हणतात.
दृष्टिकोन कसा बनला पाहिजे किंवा कसा बनवावावा ? याची सोपी पद्धत क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी शोधली. ती अशी की,आपण जे ऐकतो,पाहतो,वाचतो,किंवा आपल्यावर जे संस्कार झालेत,ते सत्य की असत्य,खरे की खोटे ? हे तपासून घेणे.म्हणजे त्याचे परीक्षण,निरीक्षण करूनच ते स्वीकारणे,अन्यथा ते संस्कार किंवा विचार सोडून देणे.आपण जे वर्तमान जीवन जगतो आहोत,त्यातील समस्यांचे कारणे शोधणे,आणि त्यावर उपाय शोधणे,हा एक सत्याचा मार्ग , नवा मार्ग राष्ट्रपिता फुलेंनी दाखविला,याच प्रमाणे सामाजिक विषमता कशी निर्माण झाली ? का निर्माण झाली ? तिचे दुष्परिणाम कोणते ? याबद्दलचा नवा दृष्टिकोन 12 व शतकात बसवेश्र्वरांनी,नंतर चक्रधर स्वामींनी,त्यांचे नंतर 16 व शतकात वारकरी संतांनी यांनी नवी दिशा दृष्टिकोन दिला.गरीबी श्रीमंती कशी निर्माण होते ? ती कशी नष्ट करायची ? याबद्दलचा नवा दृष्टिकोन कार्लमार्क नि दिला.अर्थात हे जुने नवे दृष्टिकोन तपासण्यासाठी माणसाकडे बुद्धी आहे.सत्य जाणून घेणे हेच माणसाला जमते.जनावर पक्षांना नाही जमत,कारण त्यांच्या बुद्धीला मर्यादा आहे.ते तर्क करू शकत नाहीत.परंतु माणसाची बुद्धीला मर्यादा नाही.ती तर्क करू शकते, जुने अनुभव,तपासू शकते,नवीन प्रयोग करू शकते,पुरावे गोळा करु शकते.सत्य शोधण्याचे अनेक मार्ग आता या वैद्न्यानिक काळात आणि माहिती तंत्रज्ञांच्या,काळात म्हणजे आज आपल्याकडे भरपूर माहिती, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचे शोध उपलब्ध आहेत,या आधारे आपणास प्रत्येक गोष्टीमागील सत्य सापडू शकते.परंतु ” सत्याचा शोध घेणे,आणि तेच स्वीकारणे ” असा दृष्टिकोन माणसाने स्वीकारला पाहिजे.तरच अनेक समस्यावर उपाय निघू शकतील,अन्यथा कधी महागाई,बेकारी,सरकार,जात, धर्म या अनुषंगाने एकमेकांची डोके फोडून घेणे,जागतिक युद्ध करणे चालतच राहणार आहे.
म्हणून ” विचार बदला,दृष्टिकोन बदलेल,दृष्टी बदलेल,सृष्टी बदलेल “
शांतीमय,सुखी,आनंदी,समाधानी जीवन जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत.


