Home Social घरगुती गँस (रिफील )चा वापर थांबवावा,पॉईंट धारकांवर व व्यवसायिकांवर कारवाही करावी :-...

घरगुती गँस (रिफील )चा वापर थांबवावा,पॉईंट धारकांवर व व्यवसायिकांवर कारवाही करावी :- विलास डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चिमूर शिवसेना तालुका प्रमुख यांची मागणी….

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

   चिमूर शहर,भिसी,शंकरपूर,नेरी,खडसंगी येथे अनेक हॉटेल व्यवसायीक व नाष्टा दुकानदार, तसेच कॅटर्स व्यवसायिक हे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे,यामुळे त्यांच्यावर अन्नपुरवठा विभागाने विशेष मोहीम राबवून कारवाई करावी,याबाबतची मागणी शिवसेना चिमूर तालुका अध्यक्ष विलास डांगे यांनी केली आहे.

       चिमूर तालुक्यातील अनेक मंगल कार्यालयात,मंदीरात,समाज भवनात आणि,अनेक ठिकाणी लग्न सोहळे,वाढदिवस, नामकरणविधी,असे विविध सामाजीक कार्यक्रम सुरू आहेत.

        बस स्थानक परिसरातील दुकानात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर दिसून येतोय,या शहरातील विविध भागात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सर्रासपणे सुरू आहे,याकडे अन्न सुरक्षा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित आहे काय?,की हप्ते घेऊन घरगुती गॅस सिलेंडर बेकायदेशीर वापरण्यास मदत करतात हेच कळायला मार्ग नसल्याबाबत विलास डांगे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

          शहरातील व तालुक्यातील घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या ग्राहकांना गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे,तालुक्यातील,शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

         व्यावसायिक गॅस हंडे प्रत्येकी 3000 ते 3500 रुपये दर असल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी व्यवसायिक घरगुती गॅसचा वापर करीत आहेत असे शिवसेना चिमूर तालुका अध्यक्ष विलास डांगे यांचे म्हणणे आहे.

     त्यामुळे सामान्य ग्राहाकास घरगुती गॅस सिलेंडरसाठी जास्तीची रक्कम देऊन खरेदी करावी लागत आहे.तसेच गँस संपूनही वेळेवर हंडा मिळत नाही,त्यामुळे अनेक महिला,माता,भगिनींना चुली पेटवून धूर डोळ्यात टाकण्याची वेळ आली आहे.

         या प्रकाराला आळा घालणे आवश्यक आहे व ग्राहकांना त्रास होणार नाही यांची काळजी घेणे गरजेचे आहे.गैरकायदेशीर व्यवहार बंद करण्यासाठी हॉटेल तपासनी करावी व ज्या मंगल कर्यालयात कार्यक्रम आहे,त्या ठिकाणी पथक पाठवून घरगुती गॅस चा वापर सुरु दिसेल ते सिलिंडर जप्ती करून संबंधित हॉटेल,कटर्स व्यवसायिक व हॉलचे मालक किंवा कमेटी मंगल कार्यालय मालकास प्रथम सूचना देऊन कार्यक्रम बुकिंग करतांना घरघुती हंड्याचा वापर करता येणार नाही असा करार करण्यास भाग पडावे,कायदा व सूचनांचे पालन करण्यास सदर व्यक्ती असमर्थ ठरले तर मंगल कार्यालयास सील ठोकून,मंगल कार्यालय धरकावर गुन्हे दाखल करावे,अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख विलास डांगे यांनी केली आहे.