Home शैक्षणिक श्रीराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील विद्यार्थी तालुक्यातून प्रथम,द्वितीय...

श्रीराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील तिन्ही शाखेतील विद्यार्थी तालुक्यातून प्रथम,द्वितीय आणि तृतीय… — उज्वल निकालाची परंपरा कायम राखत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान सुद्धा कायम राखला…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या आज दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता बारावीच्या निकालात श्रीराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी कुरखेडा तालुक्यातून प्रथम द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान प्राप्त केला असून उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

         कला विभाग पमधून प्रथमेश कैलास मैद या विद्यार्थ्यांनी ६०० गुणा पैकी ५०३ गुण घेवून ८४.६७ /टक्के प्राप्त करीत कुरखेडा तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. तर अश्लेषा पुंडलिक डोंगरवार या विद्यार्थिनीने ७७ % प्राप्त करीत तालुक्यातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकावला आहे.

           तर तृतीय हा थामिनी राजेंद्र मेश्राम ही विद्यार्थीनी वाणिज्य शाखेतून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक मिलेनकुमार सुखदास राऊत या विद्यार्थ्याने ७५ टक्के प्राप्त करीत तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.

       तर विज्ञान शाखेतून कोमल राजेंद्र प्रधान हिने ७३/ टक्के मिळवून तालुक्यातून विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. 

         यावर्षी सुद्धा श्रीराम कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने तालुक्यातून प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

          श्रीराम कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये संस्था सचिव दोषहरराव फाये, संस्था सहसचिव तथा प्राचार्य नागेश्वर फाये शाळा समिती सदस्य चांगदेव फाये,प्राचार्य देवेंद्र फाये, संस्था सदस्य इंजि.गुणवंत फाये, हुंडीराज फाये , मनीष फाये प्रा. प्रदीप पाटणकर, प्रा.विनोद नागपूरकर प्राध्यापिका अश्विनी फाये, शिक्षक संजय शिरपूरवार, राजेंद्र पंधरे, भास्कर बारसागडे, आशिष परशुरामकर, किशोर बनसोड, मोहन बोदले, हरीश तेलका ,पालक कुसुम मैद, विद्या मैद, आदेश.डोंगरवार,यासह श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील कर्मचारी बांधवांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन करीत त्यांचे स्वागत केले आहे.