Home Social पळसगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न… — भव्य मिरवणूकीत...

पळसगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न… — भव्य मिरवणूकीत गावातील नागरिकांसह डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा सहभाग,”गांव झाले जयभीममय!…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी 

  पळसगांव(पि)

      चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेतर्फे युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मोत्सव रॅली चे भव्य आयोजन करण्यात आले होते.

        सकाळी ९.३० वाजता बौद्ध विहार प्रांगणात उपासक- उपासिकांद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.गावातील चौकाचौकात भारत निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सव रॅली ने उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

              बौद्ध विहारातून भव्य मिरवणूकीला सुरुवात झाली,ही मिरवणूक हनूमान वार्ड,बाजार वार्ड,महात्मा ज्योतिबा फुले वार्ड,या चौक मार्गे वरून पार पडली.मिरवणुकीत बौद्ध उपासक-उपासिकांनी व गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.

       “जब तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!,अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.याप्रसंगी उपासक-उपासिका व गावातील नागरिकांसाठी महा-अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

         या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा व सिद्धार्थ विद्यार्थी फेडरेशन,महामाया महिला मंडळ समितीच्या वतीने करण्यात आले होते.

       यामुळे पळसगांवात जयभिममय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले.