Home Crime मुलानेच कुऱ्हाडीचा वार करून जन्मदात्या बापाचा केला खून… — आरमोरीत रविवार...

मुलानेच कुऱ्हाडीचा वार करून जन्मदात्या बापाचा केला खून… — आरमोरीत रविवार दि.१२ एप्रिल ला रात्रौ साडेसात घडला खुनाचा थरार!…

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी दि.१३

     बाप देवाजी धकाते,मुलगा योगाजीच्या पत्नीला रागवत असत,गर्भवती असतानाही तीला भरमसाठ कामे सांगायचे वडील!,”वडीलांची ही बाब नेहमीच योगेश ला खटकत होती.याबाबत बाप – पोरात सतत वाद होत होता.याचा राग धरून रागाच्या भरात एकूलत्या एक पोटच्या पोराने रेल्वे बोगद्यात जन्मदात्या बापाचा डोक्याच्या मागच्या बाजूला कुऱ्हाडीने वार करून खून केला.

          योगेशला पोलीसांनी अटक केली.या थरारक खूना मुळे संबंध तालुक्यात खळबळ उडाली हादरला आहे.

         पोलीसांनी सांगितले आहे की,आरमोरी येथील रहिवासी देवाजी आडकू धकाते वय ६५ वर्षे सरकारी दवाखान्यात जवळ,ताडूरवार नगर,शेती आणि त्यांचा आरमोरी शहरा लगतच वीटाभट्टीचा व्यवसाय दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा करीत आहेत.

       त्यांना पाच मुली असुन सर्वांची लग्न झालेली आहेत.हा योगेश नावाचा एकूलता एक मुलगा त्यांनी त्याचे एका वर्षापूर्वी योगाजी धकाते वय २५ वर्षे यांचे लग्न करुन दिले होते.

         योगेश व त्याची पत्नी दोघेही आपल्या राहत्या घरी आईवडीलाकडेच सोबत राहत होते.दोघेही बापमुलगा दररोज वीटाभट्टीवर वीटा करायला व व्यवसाय बघायला जात असत.

         पहाटेचे चार वाजता पासून दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परत येत होते.बाप देवाजी धकाते हे मुलगा योगाजी याच्या पत्नीवर कामासाठी नेहमीच रागवत असत.

       योगेश ची पत्नी गरोदर असताना ही बाप तीला भरमसाठ कामे करण्यास सांगायचे.ही बाब नेहमीच योगेश ला खटकत होती.त्यामुळे बाप मुलात नेहमीच वाद होऊन खडाजंगी व्हायची.हा राग योगेशने मनात ठेवून बापाला कायमचा संपवायचा असा निश्चय केला होता.

         रविवार दि.१२ ला सायंकाळी साडेसात वाजताचे दरम्यान वीटाभट्टी वरुन बाप देवाजी धकाते निघण्यापूर्वीच मुलगा योगाजी आरमोरी येथील घराकडे परत जाण्यासाठी निघाला असता रेल्वेच्या बोगद्यात या सुनसान जागी हातात कुऱ्हाड घेऊन दबा धरून बसलेले होता.

       बाप देवाजी धकाते मोबाईल फोन वरून आपल्या मुलीशी बोलत बोलत रेल्वेच्या बोगद्द्यात येताच दबा धरून बसलेला योगेशने कुऱ्हाडीने सपासप डोक्याच्या मागच्या बाजूला बापावर वार केला असताना त्यांच्या मुलीने मोबाईल फोन वर बापाच्या आर्त किंकाळ्या ऐकल्या.

        मात्र त्यांच्या बापमुलीमधील संवाद संबंध तुटून बंद झाला.त्यामुळे मुलीला शंका येवून काही तरी बापाच्या बाबतीत विपरीत घटना घडल्याची पक्की खात्री झाली.

          तीने पटकन इतरांना या विषयी अधिक माहिती दिली.योगेशने बापाचा कुऱ्हाडीने खून केल्यानंतर रक्ताने माखलेले कुऱ्हाड नहराच्या पाण्यात धुवून पुसून टाकली. 

       आणि जणू काही घडलेच नाही अशे भासवून खोट्या आविर्भावात आपले राहते घरी आला. 

        बाप अजूनही घरी आले नाही म्हणून आई चुलतभाऊ,व अन्य मंडळी सोबत बापाला शोधण्यासाठी खोटं सोंग घेऊन निघाला.शोधाशोध करता करता अखेर रेल्वेच्या बोगद्याजवळ देवाजी धकाते यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.

         सदरील बातमी वाऱ्या सारखी पसरली असल्याने आरमोरी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.प्रथमता देवाजी धकाते यांना वाघाने ठार मारल्याची हूक उडाली. 

        परंतु पोलीसांना घटना कडताच घटनास्थळी पोहोचून योगेशच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने प्रथमता त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली.

        अखेर त्याने बापाचा कुऱ्हाडीने खून केल्याची कबुली दिली.पोलीसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन अटक केली.

         अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.