दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चिमूर तालुक्यातील मौजा उसेगांव येथे सुजाता बुध्दवीहार पंचकमेटी व्दारा आयोजीत महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जंयती समारोह १३,१४,व १५ एप्रीलला सुजाता बुध्दवीहार परीसर उसेगांव येथे आयोजित केला आहे.
१३ एप्रिल २०२६ ला सकाळी ८ वा.वीहार साफसफाई, दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा,सांयकाळी ६ वाजता भीम गीत गायन स्पर्धा,राञो ८ वा.भीमगीत सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित केला आहे.
१४ एप्रील २०२६ ला सकाळी १० वाजता बुध्दवंदना१०.३० वाजता ध्वजारोहण होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत पिल्लेवान असणार आहेत तर उद़्घाटक डॉ.राजपाल खोब्रागडे हे असणार आहेत.प्रमूख अतीथी आत्माराम ढोक नागपूर,वीशेष अतीथी ॲड.शैनेशचंद्र श्रीरामे चिमूर,धनराज गेडाम सर,रमेश डांगे,हरेश बगडे पोलीस पाटील,भारत डांगे अध्यक्ष,जयपाल डांगे,यांची उपस्थिती लाभणार आहे.सायं ४ वाजता गावातून भिम रॅली नीघेल.
१५ एप्रीलला रोज बुधवारला सकाळी ११ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शामराव डांगे असणार आहेत,प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.कैलास पील्लेवान,परमानंद डांगे,प्रा.दिनेश पाटील नागपूर,शिवशंकर पील्लेवान वनरक्षक,प्रमोद पील्लेवान उसेगांव,अंबादास डांगे,हरेश बगडे पो.पा.,राजेंद्र डांगे वनरक्षक,रूचीता डांगे वनरक्षक,भारत डांगे,प्रीयंकाताई शीगाल पाटील सरपंच,हे राहणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता भोजनदान होणार आहे.राञो १०.३० वाजता “वादळ नीळ्या क्रांतीचे”, प्रकाश मेश्राम आणि संच द्वारे बुध्द भीम गीतांचा वादळी झंझावात पहावयास मीळणार आहे.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुजाता बुध्दवीहाराचे अध्यक्ष भारत डांगे,उपाध्यक्ष हरेंद्र डांगे,रवींद्र पील्लेवान,जयपाल डांगे,नंदकीशोर बगडे,राजकूमार पील्लेवान,जीतेंद्र जी.गाडगे,सर्व सुजाता बुध्दवीहार पंचकमेटी,समता सैनीक दल,रमाई महीला मंडळ,नवयुवक भिमक्रांती मंडळ भारतीय बौध्द महासभा तथा समस्त ग्रामवासीय यांचे सहकार्य लाभत आहे.



