Home Maharashtra खेड तालुका हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके यांची निवड…

खेड तालुका हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

खेड : खेड तालुका हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत बोरावके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली असून उपस्थित सदस्यांनी बोरावके यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

          पत्रकारितेतील दीर्घ अनुभव, सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडीनंतर बोरावके यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत संघटनेच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

          यावेळी संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली असून पत्रकार संघ अधिक सक्रिय करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.