Home Maharashtra महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार विद्यार्थ्यानी समाजापर्यंत नेले पाहिजे :- डॉ.केशव मेंढे

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार विद्यार्थ्यानी समाजापर्यंत नेले पाहिजे :- डॉ.केशव मेंढे

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

           चिमूर स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे सामाजिक सप्ताह निम्मित राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग द्वारा आयोजीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले.

            यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.केशव मेंढे माजी सिनेट सदस्य, रा तु म नागपूर विद्यापीठ नागपूर हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की महात्मा फुले यांना समाजाचा सर्वागीण विकास अपेक्षीत होता.

          समाजातील पुरातन प्रथा, परंपरा रूढी नाहीश्या झाल्या पाहीजे. समाजसुधारक, संस्थाअध्यक्ष लेखक, कवी , स्त्री व अस्पृश्यता उध्दारक, उदयोजक असे विविधांगी व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यानी अभ्यास केला पाहीजे. त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचावे तरच प्रामाणिकपणे आपणास त्यांच्या विचारांना अभिवादन करता येईल असे विशद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रफुल बन्सोड होते.

         त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महात्मा फुले डॉ.बाबासाहेब आंबेडकर, व तुकडोजी महाराज यांचे सामाजिक कार्य विशद केले. महापुरुषाचे विचार आत्मसात केले पाहिजे. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

            सूत्रसंचालन प्रा.निलिमा तुराणकर यांनी केले. प्रास्ताविकेत प्रा.डॉ.कार्तिक पाटील म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य काळाच्या पुढे होते. त्यांच्या कार्यातून अनेक समाज सुधारकांनी प्रेरणा घेतली.आभार विद्यार्थी विकास विभाग प्रभारी डॉ.नितिन कत्रोजवार यांनी मानले विद्यार्थ्यांनी उंदड प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगितानी झाली.