Home Maharashtra पत्रकार विलास मोहिनकर यांच्या आत्महत्या करणाऱ्या निवेदनाची पोलिस विभागाने घेतली दखल… ...

पत्रकार विलास मोहिनकर यांच्या आत्महत्या करणाऱ्या निवेदनाची पोलिस विभागाने घेतली दखल… — खोटे गुन्हे वारंवार दाखल केले जात असल्याने घेतला होता आत्महत्येचा निर्णय,केले बयानात स्पष्ट….

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर येथील रहिवासी असलेले विलास मोहिनकर हे एक संवेदनशील व्यक्तीत्व असून निर्भिड व आत्मविश्वासी पत्रकार आहेत.ते कुणाच्या दबावात न येता घटना व घडामोडी अंतर्गत वास्तव्याला अनुसरून बातम्यांचे संकलन करतात,बातम्या प्रकाशित करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देतात.

        सत्य घटना व घडामोडी अंतर्गत बातम्यांचे संकलन करणे हे काही अधिकाऱ्यांना व माफीयांना रुचत नाही.कारण सत्य घटना व घडामोडी बातम्यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने भ्रष्ट्र यंत्रणेचे व अवैध धंदेवाईक माफीयांचे पितळ उघडे पडत असते.

       याचे शल्य मनाशी बाळगून काही अधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी व वाळू माफियांनी पत्रकार विलास मोहिनकर यांच्या विरोधात अवास्तव गुन्हे दाखल करणे सुरु केले.

         असाच एक प्रकार दिनांक २४ मार्च २०२६ ला घडवून आणला गेला.पत्रकार विलास मोहिनकर आणि इतर चार पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे चिमूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.चिमूर पोलिस ठाण्यात पत्रकारांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा घटनाक्रम आमदार किर्तीकुमार भांगडिया,स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या दबावात छडयंत्राद्वारे झाला होता,हे पत्रकार विलास मोहिनकर यांनी स्पष्ट केले.

      तद्वतच गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर पाच पत्रकारांना बदनाम करण्यासाठी ठाणेदार दिनेश लबडे यांच्या द्वारा प्रेस नोट सार्वजनिक करण्यात आली होती.

      यामुळे पाच पत्रकारांच्या विरोधात वृत्त पत्रात व समाजमाध्यमावर बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या व बेकसूर असलेल्या पाच पत्रकारांची समाजात व नातेवाईकात अकारण बदनामी करण्यात आली होती.

     या अकारण बदनामी मुळे पाच पत्रकार अक्षरशः खचून गेले होते,मनस्वी कमजोर झाले होते.

          तद्वतच अकारण खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याने समाजात आणि नातेवाईकात बदनामी झाली.,यामुळे “जगून काय करायचे,हा निर्णय पत्रकार विलास मोहिनकर यांनी दडपणाखाली घेतला व आत्महत्या करीत असल्याचे लेखी पत्र त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,एसडिपिओ चिमूर,ठाणेदार चिमूर, उपविभागीय अधिकारी चिमूर,तहसीलदार चिमूर,यांना पाठवले आणि सामाजिक माध्यमावर सार्वजनिक केले.

         पत्रकार विलास मोहिनकर यांच्या त्या पत्राची पोलिस विभागाद्वारे दखल घेतली गेली.दिनांक ११ एप्रिल २०२६ रोज शनिवारला एसडिपीओ कार्यालयात बयान नोंदवून घेण्यासाठी पत्रकार विलास मोहिनकर यांना बोलावून घेतले होते.

       त्यांनी बयानात स्पष्ट केले आहे की,”चिमूर तालुक्यातील काही अधिकारी,कर्मचारी,व काही वाळू व मूरुम माफीया हे,वारंवार चिमूर पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करत असल्यामुळे,आणि समाजात आणि नातेवाईकात अकारण बदनामी करीत असल्याने मी दबावात येवून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

         पत्नी,भाऊ,बहिणी,इतर नातेवाईक आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी,पोलिस कर्मचाऱ्यांनी,मित्रांनी,आत्महत्या करु नये असे समजावून सांगितले असल्याने,”मी आत्महत्या करणार नाही,असा आता निर्णय घेतला आहे,असे पत्रकार विलास मोहिनकर यांनी बयानात नमूद केले आहे.

     एका संवेदनशील,कर्तव्यक्षम पत्रकारांवर वारंवार गुन्हे दाखल करण्यात येत असतील आणि त्यांना नेहमी बदनाम केले जात असेल तर,बदनामी पोटी सदर पत्रकारांनी आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर वेळ देणारच आहे.