Home Maharashtra ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी…

ग्रामगीता महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी…

शुभम गजभिये

 विशेष प्रतिनिधी..

       दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत ग्रामगीता महाविद्यालयात,समान संधी केंद्र व मायनॉरिटी सेल तर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली.

      या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. 

     कार्यक्रमाचे अध्यक्ष,डॉ. हुमेश्वर आनंदे व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.निलेश ठवकर,प्रा.डॉ.युवराज बोधे,प्रा.डॉ.प्रणाली टेंभुर्णे,प्रा.डॉ.सुमेध वावरे व प्रा.डॉ.सरताज शेख हे मंचावर उपस्थित होते.

       या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. 

      प्रा.डॉ.हुमेश्वर आनंदे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य व आधुनिक शिक्षण प्रणाली,स्त्री शिक्षण व शेतकऱ्यांसाठी न्याय,यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

      तसेच प्रमुख पाहुणे,प्रा. डॉ.निलेश ठवकर प्रा.डॉ.युवराज बोधे,प्रा.डॉ.प्रणाली टेंभुर्णे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      या कार्यक्रमाचे संचालन,कार्यक्रम समन्वयक,प्रा.डॉ.सुमेध वावरे,प्रास्ताविक प्रा.डॉ.सरताज शेख व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मृणाल वराडे यांनी केले.

       हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.