ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- नागरीकांचे प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे शेतकरी शेतमजूर नागरीकांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे हे आम्हचे प्राथमिक कर्तव्य आहे. या उद्देशाने महसूल विभाग हा विविध शासकीय विभागांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे.
नागरिकांना आवश्यक दाखले, जमिनी विषय कामे परवाने वेळेवर उपलब्ध व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा महत्वाकांक्षी उपक्रमातुन प्रत्येक घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ सहज व तात्काळ मिळावा हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश ठेवून प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचविण्याचा प्रयत्न करुण नागरीकाचे प्रलंबित समस्याचे निराकरण हेच समाधान शिबिराचे उदेश असे प्रतिपादन आमदार रामदास मसराम यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथे आज मंडळ अधिकारी कार्यालयात तहशिल कार्यालयाच्या वतीने आयोजित तिसरा टप्पा’महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घघाटनिय स्थानावरुण आमदार रामदास मसराम बोलत होते.
या शिबिरात आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रलंबित असलेले फेरफार नान क्रिमिनल प्रमाणपत्र सामाजिक अर्थसहाय्य वाटप रेशनकार्ड जातीचे, उत्पन्नाचे व रहिवासी दाखले यांचे जामिनीचे पट्टे वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन अर्ज स्वीकारण्यात आले आणि नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी आमदार मसराम यांनी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षही उभारण्याचे आदेश दिले.
यावेळी आमदार रामदास मसराम वैरागड मडळ कार्यालयाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी आपल्या कडे मोठ्या प्रमाणात आल्या होत्या यासाठी आपण त्यामागणीला शासन दरबारी पाठपुरावा केला याला यश येऊन वैरागडला अपर तालुका घोषित झाल्या असल्यामुळे लवकरच लाबदुरुण येणाऱ्या नागरिकांना कामासाठी दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमाला तहसिलदार उषा चौधरी नायब तहसीलदार हरीदास दोनाडकर वाकुडकर प्रशासक प्रदिप कुमरे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम प्रशासक मयुरी पेन्दाम वट्टी मैडम पोलिस पाटील तुकाराम वैद्य स्वप्निल ताडाम कृषी विस्तार अधिकारी मोगरकर कृषी मंडळ अधिकारी संदीप नाकाडे मंडळ अधिकारी कुमरे मंडल अधिकारी किरगे शामराव अलाम यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यात पिसेवडधा मंडळ परीसरातील नागरिकांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला.



