शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार (महाराष्ट्र प्रदेश) महिला आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष पदावर श्रीमती नंदिनी गोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अँड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली असून,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच महिला राष्ट्रीय अध्यक्षा खा.फौजिया खान,प्रदेशाध्यक्ष आ.श्रीकांत शिंदे आणि नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी देण्यात आली आहे.
नवीन पदावर कार्य करताना समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष संघटना बळकट करणे,तसेच पक्षाच्या धोरणे व विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी श्रीमती नंदिनी गोरकर प्रयत्नशील राहतील,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



