शेखर ईसापुरे
उपसंपादक
साकोली :-
आज मला तुमच्या शाळेत येऊन दंत तपासणी करण्याची आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली,याचा मला खूप आनंद आहे.आपल्या शरीराच्या आरोग्यासोबतच दातांचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आपण दररोज अन्न खातो,बोलतो,हसतो – या सगळ्या गोष्टींसाठी दातांची मोठी भूमिका असते.
पण अनेक वेळा आपण दातांची योग्य काळजी घेत नाही.त्यामुळे दात किडणे,हिरड्यांची सूज,तोंडातून वास येणे अशा समस्या निर्माण होतात.
फ्युचर पोदार लर्न शाळेत दंत तपासणी व मौखिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
दरवर्षी फ्युचर पोदार लर्न शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य सुव्यवस्थित राखण्यासाठी अशाप्रकारचे आयोजन केले होते.
डॉ.ऐश्वर्य पोहाणे,डॉ.देविका ऐश्वर्य पोहाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले.डॉ.देविका ऐश्वर्य पोहाणे यांनी विद्यार्थ्यांना काही सोप्या सवयी सांगितल्या.त्यामुळे दात नेहमी निरोगी राहतील.
दिवसातून दोन वेळा नीट दात घासावे.जास्त गोड पदार्थ खाणे टाळावे.पौष्टिक आहार घ्यावे.(दूध, फळे, भाज्या)
जेवणानंतर तोंड स्वच्छ धुवावे.दर ६ महिन्यांनी दंत तपासणी करावी.नर्सरी,ज्युनियर केजी आणि सिनियर केजी या बालगोपालांनी सुद्धा या शिबिरात सहभाग घेतला.
डॉ.पोहाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना तपासले.त्यांना मार्गदर्शन केले व प्रमाणपत्र देवून त्यांना गौरवण्यात आले.याप्रसंगी पालकांच्या प्रश्नांचे समाधान डॉक्टरांनी केले.मुलांना लहानपणापासूनच दातांच्या स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावाव्यात.अशी अपेक्षा डॉ.पोहाणे यांनी बोलून दाखवली.
प्रारंभी फ्युचर पोदार लर्न शाळेच्या संचालिका सौ.नमिता अजय तुमसरे,प्राचार्य निकेशन देऊरमल्ले यांनी डॉ.पोहाणे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी समन्वयक राजीव समरीत,प्रेप समन्वयक गरिमा हरदेनिया सह सर्वशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.



