बाळासाहेब सुतार
तालुका प्रतिनिधी इंदापूर
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथून सालाबाद प्रमाणे– शिखर शिंगणापूरी येथे जाणारी शंभू महादेव कावडीचे भावी सरपंच शंकर बाजीराव बोडके व सौ मंगल शंकर बोडके यांच्यासह सर्व परिवाराच्या वतीने स्वागत व पूजन केल्यानंतर स्वपत्नीक,आरती घेण्यात आली.
कोद्री तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथून शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा या ठिकाणी चैत्री वारीला जाणाऱ्या शिवभक्त कावडीची परंपरा आजही चालूच असून,मनोभावाने प्रत्येक गावोगावी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाभोजन व दर्शनाचा आनंद घेतला जातो.
अन्नदाते व प्रगतशील बागायतदार उद्याचे भावी सरपंच शंकर बाजीराव बोडके व सौ मंगल शंकर बोडके परिवाराच्या वतीने पिंपरी बुद्रुक येथे मोठ्या भक्तिभावात व उत्साहात शंभू महादेव कावडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या धार्मिक सोहळ्याला पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ,भाविक आणि कावडीचे मानकरी व मालक शंभूदेव नारायण लटपटे,अर्जुन शंभूदेव लटपटे सह सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल-ताशांच्या गजरात कावडीचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, भगवे पताकांचे आकर्षक सजावट आणि “हर हर महादेव”च्या जयघोषाने पिंपरी बुद्रुक परिसर दुमदुमून गेला.
बोडके परिवाराच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली.शिव भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याने धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले.
शिवभक्तांना महाभोजन कार्यक्रमामुळे पिंपरी बुद्रुक येथे भक्ती,श्रद्धा आणि पारंपरिक वैभवाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.



